हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव शिवारात मयताचे शेतात दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी चारचे पुर्वी यातील मयत लक्ष्मण पोतन्ना पालजवाड वय ४५ वर्षे यांनी अति पावसामुळे शेतातील पीक वाहून गेल्याने व बॅंकेच्या कर्जाची नोटीस आल्याने पैसे कसे फेडावे मुलांचे शिक्षण व घरचा खर्च कसा करावा या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खबर देणार साईनाथ पालजवाड यांनी दिलेल्या खबरीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज आकस्मिक मृत्युची नोंद झालेली असून पुढील तपास सुरू आहे.