भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा येथे वैनगंगा उडान पुलाजवळ अज्ञात चारचाकी वाहन चालकाने स्कुटीला धडक दिली. यात स्कुटी वरील 2 जण जखमी झाल्याची घटना आज दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. वनश्री पंकज बागडे वय 32 रा. आशीर्वाद नगर कारधा व अधिरा शिलेन्द्र मेश्राम वय 10 रा. आशीर्वाद नगर कारघा हे स्कुटी क्र. MH 36 AD 1480 ने भंडाऱ्याकडून कारघा ला जात असता साकोली कडून भंडाऱ्याला येत असलेली अज्ञात कारने त्यांना धडक दिली.