मारेगाव तालुक्यातील मुक्ता शेतशिवारात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी श्यामसुंदर कृष्णाजी ढवस यांच्या गाई चराईवरून परतत असताना शेतातच वाघाने अचानक हल्ला केला. यात दोन्ही गाईंचा जागीच मृत्यू झाला. मृत गाईंची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.