इचलकरंजी शहरात गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.सात दिवस,अकरा दिवस मनोभावे पूजा करून लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. मात्र पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्यानंतर एक धक्कादायक दृश्य समोर आले आहे.आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी साडे 4 वाजता पंचगंगा नदीच्या काठावर आणि वरदविनायक मंदिराच्या मागील बाजूस अनेक गणेशमूर्तींचा खच पडला आहे.