चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा २९ वा वर्धापन दिन, सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ काल पार पडला. या समारंभात परभणीचे सिनेअभिनेता, लेखक व दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे यांना महाराष्ट्रातील मानाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा यंदाचा स्व.आचार्य अत्रे पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला. परभणीसहा मराठवाड्यातील तमाम नागरिकांसाठी ही अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.