आज शनिवारी दुपारी दिग्रस शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अरुणावती धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जमाव झाला. मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून धरण शंभर टक्के भरले आहे. परिणामी सुरक्षेच्या दृष्टीने आज दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास धरणाचे सर्व ११ वक्रद्वार ४० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अरुणावती पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.