परळी शहरात घडलेल्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले आहे. मोठ्या संख्येने नागरिक व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आपला संताप व्यक्त केला. या संदर्भात आज दुपारी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने परळीतील संभाजीनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.