चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 26 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत आज दि 22 आगस्ट 12 वाजता उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, पारंपरिक कला जोपासणे आणि सण हरित पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक व कलात्मक गणेशमूर्ती तयार केल्या.