बीड जिल्ह्यात देशी विदेशी दारूची वाहतूक अवैधपणे काही ठिकाणी सुरू असते. ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे यांनी पांगरबावडीच्या पुलाजवळ पाठलाग करून अश्याच एका गाडीतून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बोलेरो गाडी (एम.एच.२३ बीसी. २७८१) मधून देशी विदेशी दारूची तस्करी करण्यात येतं असल्याची माहिती सपोनि बाळराजे दराडे यांना मिळाली होती.