लातूर,-मा.न्यायालयाचा कायम मनाई आदेश असतानाही लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने एक पानटपरी उद्ध्वस्त करून न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप पुढे आला आहे. यामुळे अंदाजे ५५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार संबंधित पीडिताने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवत दोषींवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे. अशी माहिती आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.