शीरसमुद्र परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या मुसळधार पावसाने कपाशी, सोयाबीन, तूर यासारख्या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं असून, काही शेती पूर्णपणे खरडून गेली आहे.या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शीरसमुद्र परिसरातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन