तुमसर तालुक्यात आज दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 12.30 वाजता च्या सुमारास मुसळधार पावसाने कहर केला. यात शहरातील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाने शहरातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यात पावसाचे पाणी अनेकांच्या दुकानात शिरल्याने नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले तर रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने काही तास वाहतूक व्यवस्था ठप्प पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.