आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचा आयोजन आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती आवारात करण्यात आले होते, पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि गुण्यागोविंदाने सादर करण्याच आवाहन अधिकाऱ्यांनी केल आहे. विविध अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाचे अध्यक्षांना मार्गदर्शन केले.