म्हसरूळ,पेठ रोड, मेघराज बेकरी समोर घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरा विजय चौधरी राहणार वेदनगरी सोसायटी, मेघराज बेकरी समोर, पेठ रोड यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र,सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याचे डोरले, चांदीचे पैंजण व 4 हजार 500 रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला.