विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाते. तर पालखी परतीच्या प्रवासावर असून, खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने आज दिनांक ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता श्री अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल येथून अग्रसेन चौक, कमान गेट, शहर पोलीस स्टेशन, आयकर भवन, बस स्थानक, सामान्य रुग्णालयासमोरून शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान करते. यावेळी खामगाव शहरातील नव्हेच तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखाच्या संख्येने शेगावला जातात.