महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी गोर सेना शाखा दिग्रसने केली आहे. दिग्रसच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोर सेनेच्या वतीने आज दि.१० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात बंजारा समाजाला गौर (बंजारा) या एकाच नावाने जनगणनेत नोंदवून कर्नाटक, आंध्र, तेलंगणा प्रमाणे सवलती व योजना लागू कराव्यात, तसेच न्यायमूर्ती बापट आयोग सह इतर मागणीचे निवेदन दिले.