आज सर्वत्र श्री गणेशाचे आगमन भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आलं. यानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने घरगुती गणेश नेणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे आणि युवा उद्योजक एजाज नाकाडे यांच्या संयोजनातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.