श्री.अर्चित चांडक पोलीस अधीक्षक,अकोला यांचे निर्देशानुसार ऑपरेशन 'प्रहार'मोहीम राबविण्यात येत आहे.बुधवार दि.६ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान उरळ पोलिसांनी ग्राम निंबा येथे अवैध रित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर धाड टाकली असता नारायण शालिकराम डाबेराव रा.निंबा यांना रंगेहात पकडण्यात आले.ते त्याचे राहते घराच्या मागच्या बाजूला लागून असलेल्या वाडग्यात अवैध रित्या गावरान हातभट्टी दारु विक्री करतं होते. त्याच्या जवळील ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.