सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई पुणे आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव निमित्त नागरिक येत असतात. या दरम्यान साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून जिल्ह्यात रेल्वे स्टेशन, एसटी,स्टँड ,चेक पोस्ट येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली होती ,सदर पथकांद्वारे 998 रुग्णांची तपासणी उपचार करण्यात आली.तसेच 69 रक्कम नमुने घेऊन तपासणी करिता पाठवण्यात आले.