सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निझामसागर धरणातून सकाळी १० वाजता २४ गेट उघडून १,९९,२४४ क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. तसेच श्रीराम सागर प्रकल्पातून सुद्धा ३९ दरवाजे उघडून २,७६,००० क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत विसर्ग चालू आहे. तरी धर्माबाद, बिलोली, देगलूर या गावातील नदीका