आज रविवार दि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार देगलूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे व जमीनीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेती पीक उध्वस्त झाल्यामुळे टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत मला मरू द्या आता जगुन मी काय करू असे म्हणत पाण्यात पळत जात असताना गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत आणि त्यांची सुटका केली असल्याचा व्हिडिओ आज सकाळपासूनच समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे