लातूर : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या ट्रॅफिक समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारी धक्कादायक घटना दुपारी घडली. जिल्हा परिषदेच्या जवळील सिग्नलवर प्रत्यक्ष पोलिस अधीक्षकांची गाडीच प्रचंड वाहतूक कोंडीत अडकली. आज (3 सप्टेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी शहरातील कोंडी एवढी बिकट झाली की, पोलिस अधीक्षक साहेबांच्या अंगरक्षकांना स्वतः गाडीतून उतरून रस्ता मोकळा करावा लागला. त्यानंतर तातडीने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.