दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी माननीय मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन मुंबईत होणार आहे. या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून हजारो नागरिक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत. या प्रवासादरम्यान शेकडो बसेस, चारचाकी तसेच अन्य वाहने मुंबईकडे जाणार असल्याने महामार्गावरील टोल नाक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.