जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारात एका शेतात चार दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळे वीजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही अद्याप दुरुस्ती केली नाही.तात्काळ तुटलेले तार जोडून न दिल्यास उपोषणास बसण्याचा इशारा आज सोमवार दि 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिंतूर येथील महावितरण उपअभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.