लातूर-लातूर तालुक्यातील मौजे चांडेश्वर व खोपेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. वांगी, मिरची, गोबीसह विविध भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले होते. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती.