फलटण शहरातील विरदेवनगर येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून भरदिवसा मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, सुरज बाळासाहेब जाधव, रा. विरदेवनगर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची पांढऱ्या रंगाची होंडा एविएटर मोटारसायकल प्रणित स्टार अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.