अमरावती जिल्ह्यात सततची पावसाची रिमझिम व विजांचा कडकडाट यामुळे नदीनाले भरलेली असताना चिखलदरा धारणी मार्गावरील बारू गावाजवळ रस्त्यावर झाड कोसळले त्यामुळे मार्ग बंद झाला आहे.या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली असून वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.प्रचंड वर्दळ असणाऱ्या या मार्गावर धारणी- अकोट,धारणी-ढाकणा,जामली मार्गे परतवाडा साठी खाजगी बस व महामंडळाची बसेस सुरू आहेत परंतु रस्त्यावर पडलेले झाड यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.