कुरुंदवाड शहरातील पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या जात आहेत का,याची पाहणी करण्यासाठी ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवार,दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पूरग्रस्त आणि स्थलांतरित नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली.दरवर्षीच्या प्रमाणे यंदाही पंचगंगेच्या पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.