पृथ्वीराज बाॅईज हाॅस्टेल काबरानगर नांदेड येथे दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास यातील आरोपी पवन चव्हाण व त्याचे सोबतचे असलेले दोन ते तीन ईसम यांनी संगणमत करून दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने शिवीगाळ करून मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी फिर्यादी पियुष पडवळे वय १७ वर्षे यांचे फिर्यादीवरून आज दुपारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकाॅन्सटेबल नलावडे आज करीत आहेत.