ग्रामपंचायत च्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाची कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले ग्रामपंचायतचे दस्तऐवज अज्ञात आरोपीने जाळले ही घटना सायखेडा धरण येथे दिनांक 25 ऑगस्ट रोजी घडली.याप्रकरणी अनिल निळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.