लग्नाचे खोटे आमिष दाखवून जबरस्तीने शारीरीक संबंध ठेवत पिडीत महिलेवर जादूटोणा करून भिती दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याने पिडीत महिलेने तिघांविरोधात शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता शिरोली एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शिरोली पोलिसातून मिळाली. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पिडीत महिला सावंतवाडी येथील मुळची रहीवाशी असुन ती २०१९ मध्ये शिये येथील बेबीजान दस्तगीर लेंगरे यांच्या घरी भाड्याने राहत होती.