मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरात दौरा करून विविध ठिकाणी भेट दिली. या दौऱ्यात मंत्री राठोड यांनी श्री महालक्ष्मी व श्री गणरायाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने पूजा केली. अशी माहिती मंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालय येथून दि. दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना मिळाली. दरम्यान मंत्री राठोड यांनी दिग्रस येथील माजी नगरसेवक राहुल गाडे, केतन पदमावार, गणेश करोडदेव, शिवा चिरडे यांच्या निवासस्थानी दर्शन घेतले.