तुमसर शहरातील आजाद नगर येथे एका कुलूपबंद घरात धाडसी चोरी झाल्याची घटना दि. 27 ऑगस्ट रोज बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी इकबाल मोहम्मद शफी शेख असे घरमालकाचे नाव असून ते आपल्या कुटुंबीयांसह भंडारा येथे गेले असता अज्ञात आरोपींनी घराचे दार तोडून अलमारीत ठेवलेले 53 हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.