उदगांव (ता. शिरोळ) येथे २३ जून २०१८ रोजी झालेल्या माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्या खुनाच्या प्रकरणी आरोपी पती सूर्यकांत महादेव शिंदे (रा. उदगाव) याला अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.बी.गुरवसो यांनी भा.दं.वि.कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व ९०१ रुपये दंड ठोठावला आहे.या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अति सत्र न्यायालयात २० जानेवारी २०२३ पासून सुरू झाली होती. आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता निकाल देण्यात आला.