अकोला शहरात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या जमिनीवर सोलर प्लांट लावण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित केला जाईल. यादरम्यान शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला सुरुवात होईल. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल. शांततेत, पण ठामपणे सरकारला इशारा दिला जाईल की शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. वेळ : सकाळी ११ वाजता