दर्यापूर येथील बुटी चौकातून आज सकाळी ११:३० वाजता मोटर सायकल ला लटकविलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्याने पळविली याबाबत दर्यापूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.फिर्यादी प्रतीक रामचरण ग्रहवंशी हे बँकेत त्यांचे आई चे अकॉउट मधुन पैसे काढण्यासाठी गेले होते.फिर्यादी यांनी ५०० रुपयांच्या नोटाचे ५०००० रु बंडल हे कापडी पिशवीत ठेवले व मोसा स्पेलेंडर क्रं एम एच ३० टी ३९९२ मोटर सायकल च्या हॅन्डलला पैषाची पिशवी लटकविली आणि बुटी चौकात दूध आणण्यासाठी गेले परत आल्यावर त्यांना पिशवी दिसली नाही.