तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात आज शुक्रवार दि 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता अभिरुप मतदान प्रक्रिया कार्यक्रम पार पडला.ज्ञानोपासक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात अभिरुप मतदान प्रक्रिया घेण्यात आली.नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून अभिरूप मतदान प्रक्रियेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.