भंडारा तालुक्यातील चितापूर शिवारात अवैधरीत्या जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती कारधा पोलिसांना मिळाली. त्यावरून कारधा पोलिसांनी दि. 27 ऑगस्ट रोजी धाड टाकली असता काही आरोपी हे चितापूर शिवारात कोंबड्यांच्या पायाला काती बांधून त्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना मिळून आले. आरोपी संजय साखरकर वय 44, मुकेश सोनकुसरे वय 29 दोन्ही रा. गणेशपूर, राजेश बावनकर वय 43 रा. मेंढा या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तर आरोपी विदेश मेश्राम वय अंदाजे 33 वर्षे रा. आमगाव दिघोरी फरार झाला.