देवळी ते दिगडोह मार्गावरील नादुरुस्त डायव्हर्षण रस्त्यावरून शेतकरी भारत गणपत चौधरी हे आपल्या बैलाला घेऊन जात असतांना शेतकऱ्यांसह बैल यशोदा नदीत पडला सुदैवाने शेतकरी बचावला तर बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला,ही घटना दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी जवळपास 5 वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित द्यावी तसेच डायवर्षण पूल दुरुस्त करून लवकरच पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याची शेतकऱ्यांची मागणी करण्यात येत आहे,