उपनगर भागातील विजय ममता टॉकीज जवळ सिग्नल येथे हायवा गाडीच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 65 वर्षीय एक अनोळखी व्यक्ती विजय ममता सिग्नल येथून पायी जात असताना हायवा गाडीने त्याला धडक दिली. या त्याच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर व्यक्तीची ओळख अद्याप समजलेले नसून पुढील तपास सुरू आहे.