दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात अतिवृष्टीमुळे मोठा कहर झाला आहे. दि.८ सप्टेंबरच्या रात्री पावसामुळे नाल्याचा बांध फुटल्याने तब्बल १८० घरात पाणी शिरले असून गावकऱ्यांचे हाल झाले आहेत. बाधित नागरिकांना तात्पुरता आसरा जिल्हा परिषद शाळेत देण्यात आल्याची माहिती आज दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान प्रशासनाने दिली आहे. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेकडो एकरांवरील शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.