वाघोली येथील बकोरी रोडची अवस्था फारच बिकट आहे. या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे व चिखल राडाराडा झाला आहे. यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना दुचाकी स्वारांना जीव मुठीत घालून वाहन चालवावे लागते. यातच महाविद्यालयीन विद्यार्थिनी या रस्त्याच्या दुरावस्थ्यामुळे दुचाकीवरून घसरून पडल्यामुळे त्यांचा अपघातल झाला यामध्ये जखमी झाल्या.