तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे दि. 31 ऑगस्ट रोज रविवारला रात्री वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टर क्र. MH 36 AL 6195, MH 36 AR 2456 व MH 36 AL 4309 यात रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले. या प्रकरणी तीनही ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक सुरेश विठोले, ट्रॅक्टर मालक दुर्योधन कांबळे, ट्रॅक्टर चालक देवानंद नगरधने तसेच ट्रॅक्टर चालक मुंशी बनकर व ट्रॅक्टर मालक शाहील बनकर यांच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.