चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज दि 8 सप्टेंबर ला 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.