गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी आणि ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांवर बंदी घालण्यात आली आहे.या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात राधानगरी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा कडक कारवाई केली.राधानगरी तालुक्यातील आमजाई, व्हरवडे आणि पिरळ गावांमध्ये मिरवणुकीदरम्यान दुचाकींच्या सायलेन्सरमधील पुंगळ्या काढून कर्कश आवाज करत गाड्या चालविणाऱ्या तिघे ताब्यात घेतले.