शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील करजगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून, वाहनासहित 11 लाख 29 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 22 ऑगस्ट ला तीन ते चार वाजताचेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने वाहनासहित मुद्देमान जप्त करून प्रकरणाचा पुढील तपास शिरसगाव कसबा पोलिसांकडून सुरू आहे