कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी-मुक्त शांतता,पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या सभागृहात कार्यक्षेत्रातील गावकामगार पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.