नांदेड जिल्ह्यात व शहरात गेल्या आठवड्यात १८७ मीली मिटर पेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, शहरातील सखल भागात नदी काठावर व नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून कपडा लता, अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसकट पंचनामे न करता मोजक्या व प्रतिष्ठित लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात येत आहेत या विरो