जुना मोंढा नांदेड येथे दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास यातील फिर्यादी जळबा काळेवाड हे जुना मोंढा ते सिडको असा रिक्षाने प्रवासादरम्यान त्यांचे बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे बिस्किट किमत ५ लाख ५० हजार ३६० रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.