परभणी लोकसभा मतदार संघाकरीता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज गुरुवार दि 18 एप्रिल रोजी जिंतूर विधानसभा मतदार संघास प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.यावेळी गावडे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर येथील स्टाँगरूमला भेट देवून निवडणूकीसाठी मतपत्रिकेसह मतदान यंत्राचे सिंलीगचे काम चालू असतांना प्रत्यक्ष भेट देवून निवडणुक विषयक कामकाजा विषयी सविस्तर आढावा घेतला